चंद्रपुर - नारायणा विद्यालयम् , पडोली चंद्रपूर यांच्या मागील कोरोना काळात विविध विषयाला घेवुन भरपूर तकारी येत असून , विषेशतः वेळोवेळी करत असलेली अतिरिक्त फी वाढ ही तर पालकांसाठी नेहमीची समस्या बनलेली आहे. परंतू यावेळी तर चक्क विद्यार्थ्यांची व पालकांची कुठलीही टि.सी ची मागणी नसतांना पालकांनी शाळेने वाढवलेल्या फी वाढीसंदर्भात वारंवार विचारणा करून या संदर्भात निवेदन दिले होते , विषयावरून मुख्यध्यापकाने सुढबुध्दीने परस्पर रजिस्टर पोस्टाद्वारे टि सी घरीच पाठविल्याचा प्रताप केलेला आहे. हा प्रकार शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासण्याचा असून अश्या रितीने विद्यार्थ्यांच्या मुलभुत अधिकारांवर गदा आणुन महाराष्ट्र खाजगी शिक्षण संस्था अधिनियम २०११ च्या फी संदर्भातिल नियमाला ही संस्था /शाळा केराची टोपली दाखविण्याचे काम कित्येक वर्षे करित आहे. Narayna Vidyalayam
अशा शाळेच्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार झालेले असून उदया जाऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होवुन एखादी अनुचित घटना घडल्यास यास जबाबदार कोण ? असा प्रश्न युवासेना च्या वतीने मा.अतिरीक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याशी चर्चा करून निवेदनात विचारना केली आहे. या विषयाला घेवुन शिक्षणाधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा केली असता येत्या एक दोन दिवसातच याबाबत बैठक घेऊन लवकरचं योग्य ती कारवाई करून विद्यार्थी पालकांच्या हिताचा निर्णय घेऊ असे सांगण्यात आले. युवासेना च्या वतीने अश्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी जेनेकरून पुन्हा असे कृत्य करण्याअगोदर दुसऱ्या संस्था चालकांना शंभर वेळा विचार करावा लागेल. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे यांच्या नेत्रुत्वाखाली करण्यात आली. याबाबत लवकरात लवकर कठोर पाऊले उचलुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य चांगले होईल व विद्यार्थी-पालकांना यातून दिलासा दयावा हि विनंती करण्यात आली. निवेदन देतांना युवासेना शहर चिटनीस नगाजी गनफाडे, मुकेश जक्कुलवार, नंदू अराडे युवा सैनिकांची उपस्थिती होती.