गडचांदूर:- कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषद नेहमी नाना कारणाणे चर्चेत असते.यामध्ये येथील आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील पिदूरकर यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.संबंधित वरिष्ठ अधिकार्यांकडून सध्या पाणी टाकी बांधकाम,शहरातील ओपनस्पेस सौंदर्यकरण प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी पाठोपाठ आता लाखोंचे ओपन ग्रिनजिम चर्चेत आहे.नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजप नगरसेवकांसह शिवसेना गटनेता,नगरसेवक,नगरसेविका यांनी १४ सप्टेंबर रोजी शहरातील समस्त ओपन जिमचा पाहणी दौरा केला होता.तेव्हा यांना याठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्याची माहिती आहे.यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे कळते.असे झाल्यास पिदुरकर यांना पुन्हा एका नवीन प्रकरणात चौकशीसाठी सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही ?
विरोधी नगरसेवकांच्या या दौरा संबंधी सविस्तर असे की,गडचांदूर शहरातील ओपनस्पेसवर open space ओपन जिमच्या उभारणीसाठी मागील १६ मार्च २०२० रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला.त्यानुसार विभाग प्रमूख स्वप्नील पिदूरकर यांनी त्याचे अंदाजपत्रक मंजूर करून प्रशासकीय मंजूरी सुद्धा घेतली व त्याची निविदा काढून कमी निविदा धारकाला दिली.त्यांनी ८ ते १० दिवसांपुर्वीच सदा जिमची उभारणी केली. पाहणी दरम्यान येथील साहित्य दर्जाहिन तसेच साहित्य फिटींग करताना सिमेट काँक्रिटचा वापर कमी केल्याचे दिसून आले.त्याठिकाणी लहान-लहान मुलं बाळांना कोणतीही ईजा पोहोचू नये यासाठी अंदाजपत्रकात त्याठिकाणी रेती टाकण्याचे प्रयोजन केले होते.परंतू संबंधीत green gym ठेकेदाराने असला कुठलाही वापर केलेला दिसत नाही.आत्ताच अनेक साहित्याची तुटफुट झालेली दिसत असून भविष्यात काय परिस्थिती असेल हा संशोधनाचा विषय ठरत आहे.असे असताना मागील २६ आगस्ट २०२१ रोजी ठेकेदाराला ४४ लाखांचे बिल सुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे.सदर नगरसेवकांनी हा पाहणी दौरा केला त्यावेळी साहित्यांची माहिती देणे व अंदाजपत्रक समजून सांगण्यासाठी नगरसेवक डोहे यांनी विभाग प्रमूख पिदूरकर यांना सदर ठिकाणी बोलवले असता त्यांना ऐनवेळेस कुठले तरी काम अल्याने ते येऊ शकत नसल्याची माहिती दिली.प्रमोद वाघमारे, विभागाचे बाबू यांना मी कागदपतत्रासह पाठवून माहिती देण्यास तयार सांगितले. वाघमारे व बाबू मोक्यावर आले सुद्धा मात्र त्यांना साहित्या विषयी कुठलीही माहिती नव्हती,कुठलेही कागदपत्र नव्हते म्हणून ते परत गेले.
सदरच्या साहित्याची फिटींग दर्जाहीन असून काहींचे आत्ताच नटबोल्ट गायब झाले,काही साहित्य तुटलेलेले तर काही तुटून खाली पडण्याच्या अवस्थेत आहे. अशी परिस्थिती सध्या या साहित्यांची बनलेली आहे.याबाबींचा आम्ही सर्व नगरसेवक चौकशी अहवाल तयार करून प्रथमत: नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यापुढे सादर करून चौकशीसाठी दाद मागणार आणि विभाग प्रमुख पिदूरकर यांनी सदरचे बिल देण्यासाठी एमबी कशी सादर केली याविषयी त्यांनी चौकशी करून कारवाई करावी आणि दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे यासाठी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती नगरसेवक अरविंद डोहे व इतरांनी दिली आहे.जर यांच्याकडून योग्य चौकशी करून न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारीकडे जाऊ आणि वेळ पडल्यास आंदोलन सुद्धा छेडू.असे मत या विरोधी नगरसेवकांनी सदर प्रतिनिधीपूढे व्यक्त केले आहे.आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याठिकाणी सुरू असलेला कारभार पाहता "हे देवा कुठे नेऊन ठेवला गडचांदूर माझा" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.विरोधी पक्ष नगरसेवक रामसेवक मोरे,अरविंद डोहे, शिवसेना गटनेता,नगरसेवक सागर ठाकूरवार,बालकल्याण उपसभापती सौ. वैशाली गोरे,नगरसेविका सौ.किरणताई अहीरकर यांच्यासह भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार, संदीप शेरकी,अजी़म बेग,प्रणीत अहीरकर,यश ठाकूरवार इतरांचा या दौऱ्यात सहभाग होता.सध्या जिमच्या प्रत्येक साहित्यावर खरेदीच्या किंमतीचे पोस्टर लावून "जरा जपून, महागडी वस्तू आहे" असे त्याठिकाणी असलेल्या मुलांना हे नगरसेवक असे उपहासात्मक आवाहन करताना दिसत होते.प्रत्येक जिमच्या ठिकाणी नागरिकांची सुद्धा उपस्थिती होती. जिम साहित्यावर लावण्यात आलेले दर पाहून अनेक नागरिकांनी चक्क डोक्यावर हात ठेवले हे मात्र विशेष.संबंधित विभाग प्रमुखांना सदर प्रकरणी मत जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
