गोंडपिपरी :– तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील मेंढपाळ बांधव गोंडपिपरी तालुक्यालगत असलेल्या गडचिरोली gadchiroli जिल्ह्यातील आष्टी परिसरातील कंसोबा मार्कंडा येथे उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून मेंढ्या चराई करण्याकरिता गेले होते. एफडीसीएम FDCM कक्ष क्रमांक २१७ मध्ये सदर हल्ला झाला.देवावार कुटुंबियांसोबत त्यांचा बालक देखील होता. जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने Leopard attack अचानक सात वर्षीय मनोज तिरुपती देवावार रा.भंगाराम तळोधी या बालकावर हल्ला केला त्यात त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेमुळे भंगाराम तळोधित हळहळ व्यक्त केल्या जात आहे.यावेळी आष्टी इल्लूर क्षेत्राच्या जी.प सदस्य रुपाली पंदीलवार,गडचिरोली शिवसेना जिल्हा उपप्रमुख राकेश बेलसरे,अशोक खंडाळे, गणेश शिंगाळे ,संजय भोयर,मंगेश कोरडे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकाच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करा अशी मागणी घटनास्थळ गाठून वनविभागाकडे केली.
news 34 Gondpipari
Tags:
Gondpipari