चंद्रपूर - शहरात नेहमी चर्चेत असणारा वरोरा नाका चौक येथे भर दिवसा ट्रक वरील कंटेनर पुलाच्या पिल्लर ला आदळल्याने कंटेनर चौकात पलटी झाला. ट्रक क्रमांक Mh46 AR 8014 हा चंद्रपूर वरून नागपूरच्या दिशेने जात होता.
ज्यावेळी हा कंटेनर पुलाच्या पिल्लर ला आदळला त्यावेळी ट्रक च्या बाजूने चारचाकी वाहन जात होते, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, कारण वरोरा नाका चौक हा गजबजलेला परिसर असून कुणीही त्यावेळी रस्त्यावर असते तर ह्या कंटेनर च्या आत कुणीही दबल्या गेले असते.
अचानक पलटी झालेल्या कंटेनर मुळे परिसरात मोठा आवाज झाला.
काही वेळासाठी वरोरा नाका चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती.