गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेच्या कारभारांविषयी शहरात ठिकठिकाणी विविध चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचे स्पॉट पंचनामे करून नागरिक आपापल्यापरीने सोशल मीडियावर social media मत व्यक्त करताना दिसत आहे. मग ते मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या पाणी टाकीचा विषय असो की ओपनस्पेस सौंदर्यकरण,ओपन ग्रिनजिम green gym असो, यासंदर्भात अनेक मतमतांतरे व्यक्त होताना दिसत आहे.नागरिकांच्या तक्रारी व प्रतिक्रियेवर लक्ष केंद्रित करून येथील न. प. विरोधी पक्ष नगरसेवकांनी पाहणी दौरा केला. त्यांना याकामात निकृष्ट दर्जाचे काम झाले व होत असल्याचे आढळून आले व सदर कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून या कामांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.परंतू हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून बराच कालावधी लोटूनही काहीच सकारात्मक घडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नगरसेवक डोहे यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर असे की,गडचांदूर मध्ये फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे.एक वर्षापूर्वी घनकचरा ठेक्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराची तक्रार दिली असता त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी राजूरा यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली मात्र अजूनपर्यंत कुठलीही चौकशी झाली नाही.६ जून २०२१ रोजी येथील नवीन पाणी टाकी बांधकामात भ्रष्टाचार corruption झाल्याची तक्रार केली तेव्हा जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमली परंतू ती सुद्धा समितीकडून चौकशी होताना दिसत नाही.त्यानंतर जुलै २०२१ ला नियमबाह्य, बेकायदेशिर पीएमसी देऊन नगरपरिषदेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याने मी जिल्हाधिकारी यांच्याकडे याची सुद्धा तक्रार केली परंतू याचीही चौकशी होत नाही.त्यामुळे मी प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेतली असता पंधरा दिवसापूर्वी गडचांदूर नगरपरिषदेला प्रथम अहवाल माहितीचे पत्र दिल्याची माहिती आहे.परंतू या वरिष्ठ अधिकार्याच्या त्या पत्राला येथील मुख्याधिकारी यांनी केराची टोपली दाखवली.व अजूनही कुठलाच अहवाल दिलेला नाही.त्यानंतर मी आता नुकताच झालेल्या ओपन ग्रिनजिम मध्येही मोठा भ्रष्टाचार झाला त्याची सुद्धा जिल्हाधिकारी,जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे २० सप्टेंबर रोजी तक्रार दिली याचे सुद्धा आजपर्यंत चौकशीचे पत्र निघले नाही. दिलेल्या तक्रारींवर चौकशी होत नाही,कारवाई होत नाही,यामुळे येथील अधिकाऱ्यांची हिम्मत वाढली असून भ्रष्टाचाराची मालिका सुरूच आहे. माझी जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की, दिलेल्या या सर्व तक्रारीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला पुढील पाउल उचलावे लागेल असे मत नगरसेवक अरविंद डोहे यांनी News34 ला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
