प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुका शिवसेनेच्या वतीने मुल तालुका शिवसेना कार्यालयात येणारी आगामी Shivsena Mul निवडणुकीच्या अनुषंगानेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. नगर परिषद, जि.प. व पं.स.निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे Sandip Girhe यांच्या मार्गदर्शनात मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांच्या अध्यक्षतेखालील मुल तालुका समन्वयक सुशी सरपंच अनिल सोनुले यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते.या आढावा बैठकीचे संचालन युवा सेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे यांनी केले.
या बैठकीला प्रमुख उद्देश मुल नगर परिषद mul municipal corporation क्षेत्राच्या च्या सतरा वार्डामध्ये संघटन वाढवीने तसेच प्रत्येक प्रभागात महीला व पुरूष उमेदवार तयार करून निवडणुकीत घवघवीत यश संपादन कसे करता येईल याचे मार्गदर्शन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले. Shiv bandhan
मुल तालुक्यात प्रथमच मागील ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवुन दोन सरपंच व तिन उपसरपंच तसेच एकुन 26 सदस्य निवडुन आणुन मुल तालुक्यात प्रथमच यश संपादन केले त्या यासारखे आगामी नगर पालिका, जि.प., पंचायत समिती निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.मागील कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे Cm Uddhav Thakrey यांच्या अतिशय संयमी पध्दतीने परीस्थिती हाताळली तसेच शासकीय योजनांचा आराखडा सर्व तालुक्यातील जनमानसाच्या मनात रूजवा व पक्षसंघटन वाढवुन गाव येथे शाखा घर तेथे शिवसैनिक असे बिदवाक्य घेऊन संघटन वाढवावे असेही आवाहन मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले या आढावा बैठकीला असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी हजर होते.आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर प्रेरित तसेच मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन चांदापुर येथील अनेकानी त्यामध्ये टिकाराम निशाने,देवराव इनरवार,संतोष कडुकर,संदिप अर्जनकर,हिवराज आगारे,दिनेश नागापुरे, संजय मेश्राम,हिमांशू निकुरे, गंगाधर ठीकरे राजोली असंख्य कार्यकर्ताने शिवसेनेत प्रवेश घेतला.
तसेच या आढावा बैठकीला उपस्थित मुल शिवसेना शहर प्रमुख राहुल महाजनवार, युवा सेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे ,उपतालुकाप्रमुख रवी शेरकी,सत्यनारायण अमरूदिवार शहर समन्वयक अरविंद करपे,शिवसेना उपशहर प्रमुख प्रविण नथुजी मोहुर्ले,मुल तालुका कार्यालय प्रमुख आशिष गुंडोजवार,युवा सेना सरचिटणीस विनोद काळबांधे, श्रीनिवास कन्नुरवार, तथा अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते.
