घुघुस - 2021 ला अस्तित्वात आलेली नगरपरिषद म्हणजेच घुघुस नगरपरिषद.
घुघुस वासीयांच्या अनेक आंदोलनानंतर घुघुस ग्रामपंचायतीचे अखेर नगरपरिषद मध्ये रूपांतर झाले.
काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेला महिला मुख्याधिकारी म्हणून आर्शिया शेख यांची नियुक्ती सुद्धा झाली. Ghughus Municipal Corporation
नगरपरिषदेचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले मात्र 8 सप्टेंबर ला पहाटे घुघुस नगरपरिषदेच्या इमारतीला भीषण आग लागली, सदर आगीत अनेक महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली.
इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला पण आगीच्या रौद्र रूपावर नियंत्रण मिळविण्यास वेळ गेला व महत्त्वाचे कागदपत्रे जळाले. Acc cement company च्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून आगीत अजून किती नुकसान झाले हे पोलीस तपासात पुढे येईलच.
सदर आग कशी लागली हे मात्र गुलदस्त्यात आहे.
