चंद्रपूर: दिनांक पाच सप्टेंबर रोजी कोचींग क्लासेस असोसिएशन जिल्हा चंद्रपुरची मीटिंग विजन स्पोकन इंग्लिश क्लासेस इथे संपन्न झाली . आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनाचे औचित्य साधून कोचिंग क्लासेस क्षेत्रातील सर्वात अनुभवी शिक्षक नौकरकर सर यांच्या हस्ते केक कापून तसेच शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन मिटींगला सुरुवात करण्यात आली. Coaching Centre Association chandrapur
सदर मिटिंग जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष रियासत खान सर,जिल्हा सचिव इर्शाद शेख सर,जिल्हा सहसचिव नवल काकडा सर,कोषाध्यक्ष सोनाली कथडे मॅडम, सहकोषाध्यक्ष शेखर सर, ज्येष्ठ मार्गदर्शक नोकरसर सर, संघटक श्रीकांत मदावार सर, ,सहसंघटक अतुल ठाकरे सर , प्रवक्ता चंदनवार सर ,सदस्य गजानन सर, सदस्य रमजान सर , सदस्य पॉल सर, देशपांडे सर, नासीर सर, धानोरकर सर, वाडगुरे सर, राकेश श्रिकोंडावार सर यांची उपस्थिती होती. सदर बैठकीमध्ये सन्माननीय संचालकांनी कोचिंग क्लासेस असोसिएशन सदस्यांची संख्या वाढवण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.तसेच कोचिंग क्लासेस असोसिएशनचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता समाजिक उपक्रम राबविण्यात यावे असे मत काही संचालकांनी मांडले. कोचींग क्लासेस असोसिएशन संकटाच्या वेळी रजिस्टर्ड सभासदांच्या पाठीशी उभी राहील असा ठराव एकमुखाने बैठकीत घेण्यात आला. सीसीए देश पातळीवर काम करत असल्याने त्याचा अभिनंदन ठराव सुद्धा बैठकीत पार करण्यात आला. बैठकीत नवीन सभासदांनी नाव नोंदणी करण्याकरिता पदाधिकार्यांना संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव श्री इरशाद शेख सर ,यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पॉल सर यांनी मानले.