घुग्घुस - घुग्घुस शहरातून जाणारी जडवाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी चंद्रपूर युवासेना stop heavy traffic तालुकाप्रमुख हेमराज बावणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे. Ghughus police station
सध्या घुग्घुस शहरातून coal transport कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक मोठया प्रमाणात सुरु आहे. जडवाहतुकी मुळे शहरात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे व प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या जडवाहनांना दुसरा मार्ग देण्यात आला आहे परंतु ते त्या रस्त्याने न जाता घुग्घुस शहरातून जातात त्यामुळे अपघात accident होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही जडवाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना चंद्रपूर युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे, शहर प्रमुख सतीश बोंडे, शिवसेना नेते बंटी घोरपडे ,युवा सेना शहर प्रमुख चेतन बोबडे ,उपशहर प्रमुख योगेश भांदक्कर ,निखिल मोहीतकर, उपस्थित होते.
