प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत येणाऱ्या मुल येथील तालुका स्तरीय दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री केली जाते. यामध्ये शेती,प्लॉट, जमीन, घर, याची खरेदी विक्री करुन घेत असलेल्या मूल येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून शासनाला दर वर्षाला लाखो रुपयांचा महसूल जमा होत असते परंतु एवढा महसूल गोळा होऊनही खरेदी विक्री साठी लागणाऱ्या सोई नाही, लाईट गेली तर जनरेटरची सोय नाही, ऊन पाऊस असेल तर नागरिकांना बसण्याची सोय नाही, खरेदी विक्री आणलाईन होत असल्याने पुरेशा संगणकाची सोय नाही तरी देखील लाखो रुपयांचा महसूल देणाऱ्या खरेदी व विक्रेते दारांनाच खरेदी व विक्रीपत्र होई पर्यंत दुय्यम निबंधक कार्यालय समोरच रस्त्यावर शासनाकडून पुरेशा सोई नसल्याने दिवसभर उभे राहन्याची पाळी येत असेल तर सर्वाधिक महसूल देणाऱ्या नागरिकांचा काय दोष असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य ,पुणे यांच्या अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालय मुल येथे रोजच मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात एवढेच नव्हे तर विविध बँकांचे लोन मार्गेज सुद्धा दुय्यम निबंधक कार्या लयाकडूनच करुन घ्यावे लागते त्यामुळे शासनाला रोज लाखो रुपयांचा महसूल जमा होत असते. अशा प्रसंगी खरेदी विक्री व लोन मार्गेज करण्यासाठी येणाऱ्या खरेदी दार व विक्रेते दार यांना अत्यावश्यक सोई राज्य शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात अत्यावश्यक सोई त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.
