प्रतिनिधि/सै. मुमताज अली
गडचांदूर :- सुदृढ बालके घडविण्याची फार मोठी जबाबदारी अंगणवाडी कार्यकर्तीवर आहे.हे गांभीर्य ओळखून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे. असे प्रतिपादन कोरपनाचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश जाधव यांनी केले.ते गडचांदूर विभागाच्या गडचांदूर येथील अंगणवाडी क्र.५ येथे झालेल्या "राष्ट्रीय पोषण अभियान" National Nutrition Campaign कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.तसेच त्यांनी गरोदर माता, स्तनदा माता,आणि किशोरी मुलीचे एच.बी. तपासणी आणि त्यामध्ये वाढ करण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गडचांदूर नगरपरिषद नगरसेवक तथा आरोग्य सभापती राहुल उमरे आणि शिवसेना गटनेते, नगरसेवक सागर ठाकूरवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानंतर परसबाग आणि लावण्यात आलेल्या सुदृढ आहार प्रदर्शनीत Strong diet exhibition उपस्थित महिलांना प्रात्यक्षिके दाखवली,याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यानिमित्ताने पोषण आहार रॅली काढण्यात आली. सूत्रसंचालन गडचांदूर विभागाच्या पर्यवेक्षिका द्रोपदी तोतडे तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका लता अहिरकर यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमात गडचांदूर विभागाच्या सर्व अंगणवाडी सेविका, परिसरातील महिला, किशोरी मुली आणि बालकांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.