कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरोनाची पार्श्वभुमी लक्षात घेता शासनने पोळा उत्सव सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई केली आहे.यामुळे सदर उत्सवावर एकाअर्थी विरजण पडल्याचे बोलले जात आहे.शासन आदेशाचे पालन करत तान्हापोळा घरीच साजरा करण्यात येत असून मागील वर्षी प्रमाणे यंदाही गडचांदूर येथे पोळा समिती,पोलीस स्टेशन, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन "तान्हापोळा" स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.पारंपारिक सजावट, वेशभुषा व सामाजिक संदेश देणारा एक फोटो व एक मिनिटाचा व्हिडीओ येत्या 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजकांच्या मोबाईल नंबरवर पाठीवण्याचे आवाहन पोळा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मान्यवरांच्या शुभहस्ते ९ सप्टेंबर रोजी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे.तरी शहरातील बालकांनी जास्तीतजास्त संख्येने सदर स्पर्धेत सहभागी होऊन आपले व्हिडीओ 9423417151,9850678318,7588883625,9890388908,8862008813,9689357984 यापैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर पाठवावे असे आवाहन रोहन काकडे,मनोज भोजेकर,पवन राजूरकर,मयूर एकरे,वैभव गोरे व पोळा समिती आयोजकांनी New34 च्या माध्यमातून केले आहे.सदर स्पर्धा फक्त गडचांदूर शहरापुर्तीच मर्यादित असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.