मुल- कित्येक दिवसापासून ओबीसींच्या आरक्षणासाठी सतत झटून,पाठपुरावा करुन अखेर आठ जिल्ह्यातील ओबीसींचे obc reservation आरक्षण वाढविल्याबद्दल ओबीसी बहुजन कल्याण मंत्री, तथा मदत पुनर्वसन आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व ओबीसींच्या वतीने आभारही मान्यण्यात आले. यावेळी राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे National Federation of OBCs महासचिव सचिन राजूरकर, ओबीसींचे युवा नेते व चंद्रपूर महानगर पालिकेचे विरोधी नगर सेवक नंदुभाऊ नागरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, obc ओबीसींचे व कांग्रेस नेते आणि समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक पा. वाढई, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश रत्नावार, गणेश आवारी, भुवन चीने उपस्थित होते. याप्रसंगी नाम.विजय वडेट्टीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन ओबीसींच्या वतीने अभिनंदन करुन आभारही मानले आहे.