प्रतिनिधि/गुरु गुरनुले
मुल - राजोली वासीयांनी मला भरपूर प्रेम दिले, एवढेच नव्हेतर कांग्रेसनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायतीवर बहुमताने झेंडा रोवला याचा मला अभिमान आहे. परंतु कोरोना महामारीमुळे आपले आभार मानायला सुद्धा मला येता आले नाही. तरी देखील माझे सहकारी आपले कांग्रेस नेते,चंद्रपूर CDCC बँकेचे अध्यक्ष तथा जि.प.माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना जिल्हा परिषद,बाजार समिती,बँक अशा तीन पदाचा अनुभव असल्यामुळे CDCC BANK CHANDRAPUR शेतकऱ्यांसाठी बँकेच्या योजना आपल्या पर्यंत पोहचविण्याचे काम सतत करीत या योजनांचा गरिबांनी, सुशिक्षित युवकांनी, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगत मी आलो नसलो तरी आपल्या पाठीशी खांभिरपणे उभा असून राजोली ग्राम पंचायतीला ३० लाखाचा निधी लवकरच उपलब्ध करुन देणार असे आश्वासन खासदार बाळूभाऊ धानोरकर राजोली वासीयांना दिले. व कॅन्सरग्रस्त नीरज CANCER पेशट्टीवार यांना बँकेतर्फे ३० हजाराची मदत चेकद्वारे पंचायत समिती उपसभापती जयश्री वलकेवार, सरपंच जितेंद्र लोणारे,माजी उपसभापती गजानन वलकेवार यांचे समक्ष सुपूर्द केला. MP BALU DHANORKAR बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी CDCC बँकेच्या योजनांचा महिला,पुरुष,बचत गटांनी, लाभ घावा, किरकोळ व्यवसाय करावा अशी उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी, महासचिव विनोद दत्तात्रय, बसलसिंग, सोहिल शेख, तालुका कांग्रेस अध्यक्ष,घनश्याम येनुरकर,संजय गांधी योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार, गुरुदास चौधरी, माजी उपसभापती सुनील गुज्जनवार, उपसरपंच गजानन ठिकरे, माजी नगर सेवक गुरु गुरनुले, विविध कार्य.सोसायटीचे संगीता गरमळे, कांग्रेसचे निष्ठावाण माजी सरपंच एम शरीफ भाई, गांगलवाडी सरपंच वासुदेव आवळे,उपसरपंच नंदू मेश्राम, अध्यक्ष गिरीधर पाकमोडे, ग्राम पंचायत सर्व सदस्य,प्रतिष्ठित नागरिक, राजोली युवक कांग्रेसचे असंख्य युवक संख्येनी उपस्थित होते.
