राजुरा - दारू विकणाऱ्याना मुलगी पटते पण मला नाही, आमदार साहेब जरा लक्ष द्या, असा मजकूर लिहत थेट आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहणारा भूषण आमदार धोटे यांना सापडला.
भूषण राठोड ने त्या पत्राबाबत खुलासा करताना सांगितले की पत्र व्हायरल virul माझ्या मित्रांनी केले, गंमतीचा भाग म्हणून ते पत्र लिहण्यात आले मात्र ते इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होणार याची जराही कल्पना Idea मला नव्हती.
आमदार धोटे हे माझ्या वडिलांसारखे आहे, आमच्या मतदार संघात त्यांनी खूप कामे केली आहे, त्यांचं मन दुखविण्याचा आमचा हेतू नव्हता याबद्दल मी त्यांची मनापासून माफी मागतो.
ते पत्र व्हायरल झाल्यावर आमदार धोटे यांनी त्या युवकाला शोधण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते त्यानंतर हा युवक आमदार धोटे यांच्या कार्यकर्त्यांना चंदनवाही येथे गवसला.
मुलगी पटत नाही आहे, आपण काही उपाययोजना करून मला गर्लफ्रेंड girlfriend मिळवून द्यावी अश्या प्रकारचे लिखाण त्या पत्रात करण्यात आले होते.
मात्र आता भूषणच्या माफीनाम्याने प्रकरण शांत झाले असले तरी आमदार धोटे यांना काही वेळासाठी मनस्ताप जरूर झाला.