ऊर्जानगर(चंद्रपूर):-सद्याच्या पावसाळ्याच्या या परीस्थितीत डेंगू मलेरिया सारख्या बिमारीने जोर केलेला असून खास करून ग्रामीण भागात याचा जास्त प्रादुर्भाव आहे.या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे सद्या रक्ताचा फार मोठा तूटवटा जाणवत आहे.तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष मा सुरेश केसरकर यांच्या सूचनेनुसार एक सामाजिक बांधिलकी असल्याने व रक्तदानाची गरज लक्षात घेता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र ,राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या जिल्हा गुणवंत कामगार तसेच युवा फाउंडेशन ऊर्जानगरच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकदिनी कामगार कल्याण केंद्र सुपर एफ चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीतच्या सहभागाने करण्यात आले.
या कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राचे उपमुख्य अभियंता मा राजेश राजगडकर अध्यक्ष होते तर उदघाटक मा किशोर राऊत उपमुख्य अभियंता होते प्रमुख पाहुणे आर के ओसवाल उपमुख्य अभियंता, संगीता बोदलकर वैद्यकीय अधीक्षक सी टी पी एस दवाखाना,मा नरेंद्र रहाटे उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, मा मंजुषा येरगुडे सरपंच ग्राम पंचायत ऊर्जानगर,देवराव कोंडेकर सह खजाणीस राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, वेदांत गेडाम शाखाध्यक्ष युवा फाउंडेशन,अंकित चिकटे उपसरपंच ग्रा पं ऊर्जानगर,मा पवार पी आर ओ रक्त संक्रमण सामान्य रुग्णालय चंद्रपूर,मा सुधाकर काकडे उपाध्यक्ष जिल्हा गुणवंत कामगार असोसिएशन यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा किशोर राऊत यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली व रक्तदात्यांना मार्गदर्शन केले.नरेंद्र रहाटे यांनी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारिणीच्या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देऊन असेच संयुक्त कार्यक्रम राबवावे असे म्हटले. संगीता बोदलकर,मंजुषा येरगुडे यांनी शिबिराला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश राजगडकर यांनी अध्यक्षीय भाषणात संयुक्तरित्या राबविलेल्या या रक्तदान शिबिरास आयोजकांचे भरभरून कौतुक केले व असेच नेहमी संयुक्त कार्यक्रम राबवून सामाजिक व राष्ट्रीय कार्यास सहभाग घ्यावा असे सांगितले.या कार्यक्रमात युवा फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन वंश नकोसे व सर्व पदाधिकारी व सदस्यांचा तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी भरगच्च रक्तदात्यांनी रक्तदान श्रेष्ठदान जीवनदान समजून रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी घेतला.यावेळी चंद्रपूर जिल्हा गुणवंत कामगार असोसिएशनच्या कार्यकारिणीची घोषणा करून नियुक्ती पत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अख्तर खान कार्याध्यक्ष चंद्रपूर जिल्हा गुणवंत कामगार यांनी केले तर प्रास्ताविक संजय वानोडे केंद्र संचाकल कामगार कल्याण केंद्र व आभार देवराव कोंडेकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजा वेमुला, नारायण चव्हाण,शिवाजी नागरे,धर्मेंद्र कनाके, तसेच केंद्राचे कर्मचारी मोहना खोब्रागडे, रामदास वानखेडे,कविता सदाफळे,सुवर्णा उपरे यांनी सहकार्य केले.