चंद्रपूर - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन lottery व सट्टा बाजार सुरू असून online lottery सध्या कारवाईच्या दूर असली तरी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सट्टे बाजांवर कारवाईचा धडाका सुरू केला.
सट्टेबाजांवर कारवाईची जिल्ह्यात मोहीम सुरू केली असून जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या निर्देशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक तयार करीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजांवर कारवाई केली. LCB chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथे 5 आरोपींना अटक करीत 30 हजार 260 रुपये, शहरातील रामनगर हद्दीत एका आरोपीला अटक करीत 16 हजार 155 रुपये, वरोरा येथे एका आरोपीला अटक करीत 11 हजार 710 रुपये, सावली येथे 2 आरोपींना ताब्यात घेत 11 हजार 710 रुपये, भद्रावती येथे एका आरोपीला ताब्यात घेत 2 हजार 605, भद्रावती येथे दुसऱ्या कारवाईत एक आरोपी 3 हजार 205 रुपये, कोरपना येथे एक आरोपीला ताब्यात घेत 1 हजार 685 रुपये व मूल येथे 1 आरोपीला ताब्यात घेत 1 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्याभरात सट्टेबाज विरोधात चालविलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मोहिमेत एकूण 12 आरोपी व 79 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.