चंद्रपूर - दिनांक 8/9/2021 ला चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शहर कार्यकारणी, प्रभाग अध्यक्ष,आणि वॉर्ड अध्यक्ष ह्यांची सयूंक्त बैठक चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे निरीक्षक तथा पक्ष प्रवक्ते मा श्री प्रवीण कुंटे पाटील साहेब ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जयश्रिया लॉन बायपास रोड चंद्रपूर येथे संपन्न झाली.
बैठकीत निरीक्षक कुंटे पाटील साहेब ह्यांनी उपस्तीत पदाधिकारी , प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष ह्यांचा सविस्तर आढावा घेतला
सदर आढावा बैठकीचे आयोजक शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्याच्या आढावा सादर केला.
आढावा बैठकी मध्ये प्रभाग अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्षांनी आपआपल्या वॉर्डातील आणि प्रभागातील पक्ष कार्याचे अहवाल निरीक्षक मा श्री कुंटे साहेब ह्यांच्या समोर सादर केला.
बैठकीला मार्गदर्शन करतांना समोर होणाऱ्या महापालिका संदर्भात प्रत्येक वॉर्डा मध्ये बैठका घेऊन पक्ष मजबुती करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. Chandrapur Ncp
आढावा बैठकीला विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,माजी शहर अध्यक्ष शशिकांत देशकर, महासचिव धनंजय दानव,संभाजी खेवले, उपाध्यक्ष निसार शेख, चेतन धोपटे,कुमार पॉल, तसेच चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, आणि वॉर्ड अध्यक्ष उपस्तीत होते.
