ब्रह्मपुरी - दिनांक 10 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी च्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील पोलीस पाटील यांच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायदा याबद्दल मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावात अंधश्रद्धेच्या घटना घडू नयेत यासाठी तरुणांनी सजग राहणे आणि जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत श्री मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांनी अध्यक्षीय मनोगतात मांडले. Guidance on anti-witchcraft law
याप्रसंगी ठाणेदार श्री रोशन यादव यांनी गावकर्यांनी अंधश्रद्धेच्या घटनांना निर्बंध घालण्यासाठी पोलीस विभागास सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रा बालाजी दमकोंडवार तालुका संघटक अ भा अंनिस ब्रम्हपुरी, यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व आणि जादूटोणा विरोधी कायदा याबाबत मार्गदर्शन केले. तर सुजित खोजरे सदस्य अ. भा. अंनिस चंद्रपूर. यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची आवश्यकता विविध उदाहरणातून पटवून दिली. याप्रसंगी श्री अशोक रामटेके, उपाध्यक्ष नगरपरिषद ब्रम्हपुरी, श्री बंटी श्रीवास्तव, डॉ प्रेमलाल मेश्राम, नगरसेवक श्री मनोज वठे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी ब्रम्हपुरी तालुक्यातील पोलीस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जादूटोणा विरोधी कायद्याच्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.