प्रतिनिधी/सै. मुमताज अली
गडचांदूर :- गडचांदूर नगरपरिषदेकडुन शहरातील विविध प्रभागाच्या ओपनस्पेसवर लावण्यात आलेले "ओपन ग्रिनजिम" सध्या शहरात चर्चेचा विषय बनला असून सदर प्रकरण शहरा पुरतेच मर्यादित न राहता थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनापर्यंत पोहोचले आहे.नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजप नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांच्यासह शिवसेना shivsena गटनेता नगरसेवक सागर ठाकूरवार,शेख सरवर, सौ.वैशाली गोरे,सौ.सुनीता कोडापे,सौ.किरण अहिरकर व शेख रजी़या या नगरसेवक, नगरसेविकांनी २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे नवीन पाणी टाकी बांधकाम, ओपनस्पेस सौंदर्यीकरण प्रकरणाच्या चौकशी पाठोपाठ आता Green Gym ग्रिनजिमच्या कामाची सुद्धा चौकशी होणार यात दुमत नाही.
नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे सविस्तर असे की,नगरपरिषदच्या १६ मार्च २०२० रोजीच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अंदाजे १२ सर्व्हे नंबरच्या ले-आऊट मधील ओपनस्पेसवर ग्रीन जिम साहित्य लावण्याबाबत ठराव मंजूर करून नंतर जिम साहित्याची दर निविदा बोलाविण्यात आल्या. मात्र इतर दुसरे कुणी यात सहभाग घेऊ नये, कमी किंमतीची निविदा भरू नये यासाठी अशा एका वृत्तपत्रात जाहीरात देण्यात आली जे वृत्तपत्र गडचांदूर शहरातच येत नाही.आणि संगनमत करून त्यात अमाप दर टाकण्यात आले.हे कोटेशन ज्यांचे आहे ते बहुतेक अस्तित्वात सुद्धा नसावे अशी शंका आहे. यात आपल्या मनमर्जीने दर टाकून निविदा भरल्या व त्या निविदा समितीने उघडल्यानंतर कमी दरातील निविदा स्थायी समितीने मंजूर केल्या. मात्र ते दर बाजार दरांपैकी कितीतरी पटीने अधिक आहे. निविदा धारकांची जर सखोल चौकशी केल्यास निश्चितच खरे चित्र समोर येईल.
या दरानुसार अंदाजपत्रक तयार करून चंद्रपूर सा.बां.विभागाकडून तांत्रिक मंजूरी घेऊन हे काम नगरपरिषदेच्या सहाय्य निधीतून घेण्याचे ठरविले. व इतर आवश्यक बाबी पूर्ण केल्यानंतर या कामाच्या ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आणि निकटवर्तीला काम दिले. परंतू सदर निविदेतील दर बाजार दरांपेक्षा खूप जास्त असल्याची शंका व्यक्त करत फेर निविदा बोलाविण्यात यावी अथवा दर निश्चित केलेल्या कामाचा कार्यदेश देऊ नये.जर असे झाल्यास ३० लाखाहून अधिक असे फार मोठे नुकसान नगरपरिषदेचे होणार असल्याची शंका नगरसेवक डोहे यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना २९ आक्टोंबर २०२० रोजी निवेदनातून व्यक्त केली होती.असे असताना मंजूर नसलेल्या ठिकाणी जिमच्या साहित्यांची फिटिंग करण्यात आली व बिल ठेकेदाराला दिले.जिम सहित्याचा दर्जा योग्य नाही,फिटिंग योग्य नाही,काँक्रिटीकरण योग्य नाही,जे केले ते फुटले,त्याठिकाणी रेती टाकली नाही,काही ठिकाणी चिखल पसरून आहे,अशा अनेक ठिकाणाहून अनेक तक्रारी या विरोधी नगरसेवकांना प्राप्त होत असल्याने यांनी नुकतीच शहरातील संपूर्ण जिमची पाहणी केली तर सत्य परिस्थिती समोर आली. यासंबंधी सविस्तर मौक्का पाहणी अहवाल तयार करून जिल्हाधिकारी, जिल्हाप्रशासन अधिकारी (न.प.) यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून न.प.मुख्याधिकारी, विभाग प्रमुख व ठेकेदार यांनी संगनमत करून या कामात लाखोंचा भ्रष्टाचार corruption करून नगरपरिषदेचा आर्थिक नुकसान केल्याचे आरोप करत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,तत्थे आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या नगरसेवकांनी निवेदनातून केली आहे.आता सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहोचल्याने चौकशीअंती काय घडतंय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.