प्रतिनिधी/सै. मुमताज अली
गडचांदूर :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यापाऱ्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.या काळात अनेक व्यापाऱ्यांनी आपला जीव सुद्धा गमवले.आता मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज असून शासन नियमांचे तंतोतंत पालन करत लसीकरणाचे उद्दिष्ट्य पुर्ण करण्यासाठी शहरातील समस्त व्यापारी बंधूंना प्रेरित करू,प्रत्येक व्यापारी बंधूंना मास्क, सॅनिटायजर,सोशल डिस्टंसिंगचा वापर करण्यासाठी आग्रह धरू,असे मत गडचांदूर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी व्यक्त केले. Traders Association
ते येथील हॉटेल चांदणी चौक येथे आयोजित गडचांदूर व्यापारी असोसिएशनच्या एका छोटेखानी सभेत बोलत होते. ready to fight Corona
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री,सचिव विवेक पत्तीवार,गडचांदूर व्यापारी असोसिएशनचे सचिव प्रशांत गौरशेट्टवार, उपाध्यक्ष धनंजय छाजेड यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.'हस्तांदोलन नको, नमस्कार करू, कोरोनापासून बचाव करू' असे फलक हातात घेऊन कोरोनाशी लढण्याचा निर्धार यावेळी व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आला. चर्चेदरम्यान उपस्थित व्यापारी बांधवांनी येणाऱ्या विविध अडचणींवर आपले मत मांडले.रवी गेल्डा, मनोज भोजेकर,राजू सचदेव,जावेद मिठाणी, सलीम किडीया,चंदू वडस्कर,शिरिष भोगावार, विठ्ठल वैद्य, प्रशांत दरेकर,मारोती चापले,सचीन निले आदी व्यापारी बंधूंची सदर बैढकीत उपस्थिती होती.
