सावली - तालुक्यातील कीसाननगर kisan nagar येथील युवक शेतकरी सुरेश सुनील कुडावले 27 याचा शेतातच सर्प दंश snake bite झाल्याने मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरेश कुडावले हा दुसऱ्याच्या शेतात मजुरीने गेला होता. शेतीला पाणी देण्यासाठी मोटारपंप सुरू करताना नाग सापाने सुरेशच्या हाताला तीन वेळा दंश केला. उपचाराकरिता त्याला गडचीरोली जील्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असता तेथेच त्याचे निधन झाले. Farmer death त्याच्या पश्चात आई, पत्नी, दिड वर्षाचा एक आणि दिड महीन्याचा एक मुलगा आहे. घरची परीस्थिती बेताची असल्याने शासनाने कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.