चंद्रपूर - जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी करून नोकरीवर रुजू करण्याचा आदेश निघाला, मात्र 2019-20 या वर्षात कोणतीही पदभरती चंद्रपूर जिल्हा परिषदेने राबवली नव्हती. Fraud in chandrapur zp
सोमवारी काही युवकांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांची भेट घेत नियुक्तीपत्र दाखविले ते पत्र बघून सीईओ ह्या सुद्धा बुचकळ्यात पडल्या. Zila parishad chandrapur
त्या युवकांनी सेठी यांना माहिती दिली की असे आदेश तब्बल 20 ते 22 युवकांकडे आहे.
बल्लारपुरातील एका व्यक्तीने जिल्हा परिषदेत वर्ग 3 च्या नोकरीसाठी लावून देतो असे सांगत युवकांकडून लाखो रुपये उकळत त्यांचा नियुक्तीचा बनावट आदेश काढला. Fake signatures
या सर्व प्रकाराची माहिती डॉ. सेठी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिली असून याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मात्र बल्लारपुरातील त्या व्यक्तीने चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असं काम करून Natwarlal "नटवरलाल अभी जिंदा है" असा इशारा सुद्धा या फसवणुकी माध्यमातून प्रशासनाला दिला आहे.