चंद्रपूर: बाबुपेठमधील 17 वर्षीय युवतीला प्रफुल्ल आत्राम नामक इसमाने चाकूने चौदा वार 14 stab wounds करून, गंभीर जखमी केले. यात या युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण शहरात खळबळ माजली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडून घेतली असून, आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रक कोर्टात fast track court चालवला जाणार, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार guardian minister vijay vadettiwar यांच्या कार्यालयातून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात येईल, पीडित कुटुंबाच्या प्रति आपली सांत्वना असून कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.