चंद्रपूर - दिनांक 21/09/2021 ला श्रीमती लीलाबाई रामचंद्र घडसे रा. सावली ही आपल्या भावाला क्रांतीलाल रायपुरे रा. छत्रपती चौक बाबुपेठ येथे भेटायला आली होती ती परत जाताना बल्लारशाह बायपास रोड वर एका अज्ञात वाहनाने जे अतिवेगाने होते त्या वृद्ध महिलेला उडविले यात ती जागीच मृत झाली त्यानंतर परिस्थिती चिघळत असताना सुध्दा पोलीस प्रशासनाचे कोणतेही अधिकारी तिथे पोहचले नाही. 2 तास उलटले असताना सुध्दा पोलीस प्रशासनाचे कोणतेही अधिकारी आले नसल्याने याची माहिती आम आदमी पार्टी चे शहर सचिव यांना मिळाली.
Accident in ballarpur bypass road
त्यानंतर आप चे कार्यकर्ते आणि शहर सचिव यांनी पोलीस अधिकारी यांच्या शी फोन द्वारे याची माहिती दिली त्यानंतर रामनगर पोलीस स्टेशन ची टीम पोहचली येथे पोहचायला उशीर का झाला .? याबाबत वरिष्ठ अधिकारी येथे बोलवा आणि ramnagar police station जनतेचे समाधान करावे या भूमिकेत आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे होते. त्यानंतर प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली. पोलीस अधिकारी यांनी माफी मागून २४ तासाच्या आत आरोपी चा शोध घेऊ असे आश्वासन दिले, आणि मृत व्यक्तीच्या परिवाराला आर्थिक मदत मिळवून देण्याचा सुध्दा प्रयत्न करू असे वरिष्ठ अधिकारी ने आश्वासन दिले. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली आणि शव रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. शेवटी बोलताना आप चे राजु कुडे यांनी
संबधित तीन CCTV कॅमेरे च्या माध्यमातून शोध घ्यावा अशी अधिकाऱ्यांना विनंती केली.
यावेळेस आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजु कुळे, बाबुपेठ प्रभाग चे संयोजक श्री सुखदेव दारूंडे, बाबाराव खडसे, चंदु मंदूरवार, निखिल बरसागडे, जयंत थूल, श्रीमती सुजाता ताई बोदेले, कु. ऐश्वर्या वासनिक, जयदेव देवगडे, अश्रफ सय्यद, प्रवीण चुणारकर, कालिदास ओरके, दीपक उंदिरावडे, सुरेंद्र जीवने, शुभम गेडाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होतें.