प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - दिनांक 22/09/2021 रोजी तहसिल कार्यालया,मूल येथे राकेश या.रत्नावार, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना समिती Sanjay Gandhi Niradhar Yojana Samiti यांचे अध्यक्षतेखाली लाभार्थ्याचे प्रकरणे मंजूर करण्याकरिता सभा आयोजित करण्यांत येऊन इंदिरा गांधी विधवा योजना Indira Gandhi Widow Scheme - 6 व संजयगांधी निराधार योजना - 13, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना -2 श्रावणबाळ योजना - 64 वृध्दपकाळ योजना - 50, असे एकूण 135 प्रकरणे अध्यक्ष व समिती सदस्यांनी मंजूर केल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहे परंतु, सदर प्रकरणात ज्या कांही त्रृटी आहेत त्या त्रृटया तात्काळ दुरूस्त्या करून विशेष सभा आयोजित करण्यांबाबत निर्णय घेण्यांत आलेला होता. निर्णयाचे अनुषंगाने 1 महिण्यांत पुन्हा सभा घेवून लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात येऊन समिती शब्द पाळलेला आहे.
तसेच, माहे जुलै,ऑगष्ट्र महिण्यांचे शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामूळे अनुदान वितरणास थोडा विलंब झालेला आहे. अनुदान तात्काळ प्राप्त करण्याकरिता शासनास विनंती करण्यांबाबत समितीचे वतीने विनंती प्रस्ताव सादर करण्यांत आलेला आहे.
कोवीड-19 च्या प्रार्दुभावामुळे मृत्युपावलेल्या कुटूंबातील पत्नीला अनुदान देण्यांचे दृष्टीने शासनाने बि.पि.एल.ची अट घातलेली आहे त्यामूळे, अनेक कुटूंबातील व्यक्तीकडे बि.पि.एल.कार्ड नसल्यामूळे अनुदानापासून वंचीत आहेत. याबाबत समितीचे सभेत सविस्तर चर्चा करण्यांत येऊन कोवीड-19 च्या प्रार्दुभावामुळे अनेक कुटूंबावर आर्थीक संकट ओढावलेले असून त्यांना आर्थीक सहाय्य करण्यांचे दृष्टीने बि.पि.एल.ची अट शिथील करण्याबाबत शासनास विनंती करण्यांत यावे असे समितीचे सभेत ठरविण्यांत आलेले आहे.
तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री.राकेश या.रत्नावार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्यांचे दृष्टीने प्रयत्नशिल आहेत. सदर योजने संबंधाने कांही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी. व दलालापासून सावधान राहावे. याऊपरही काही अडचण असल्यास संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेशी संपर्क साधावा.
तरी सदर सभेला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, मा.राकेश या.रत्नावार, मा.ठाकरे साहेब,नायब तहसिलदार, तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्री.नितीन येरोजवार,श्री.गंगाधर कुनघाटकर,श्री.दशरथ वाकुडकर, श्री.संजय गेडाम, सो.अर्चना चावरे, सौ.रूपाली संतोषवार व संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित कर्मचारी श्री.गिरडकर उपस्थित होते.