गडचांदूर :- गडचांदूर जवळील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या अंमलनाला धरण येथील निसर्गरम्य, मनमोहक वेस्टवेअरचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक परिवारासह दररोज याठिकाणी येतात.मात्र काहींना हे पर्यटन स्थळ tourism जीवावर बेतत आहे.गेल्या महिन्यात याठिकाणी चंद्रपूर chandrapur येथील एका तरुणाने आपले जीव गमवला होता. ही घटना ताजी असतानाच १४ सप्टेंबर रोजी पुन्हा दोन युवकांचा येथील पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे.यावर्षाची ही तीसरी घटना असून याला जबाबदार कोण ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थीत होत आहे.सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही मृतदेहांना पाण्याबाहेर काढले. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.नदीम अली वय वर्ष २१ रा.बल्लारपूर,तौफी़क शेख वय वर्ष २२ रा.विहीरगाव असे मृतकांची नावे असल्याचे कळते. Amalnala Dam 2 death
दरवर्षी याठिकाणी एक ना एक जीव जातो.पर्यटकांची गर्दी लक्षात घेता याठिकाणी पोलीस नेमण्यात यावे, जनतेच्या या मागणीनुसार याठिकाणी पोलीस कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली मात्र हे कर्मचारी आपले कर्तव्य नीट पार पाडताना दिसत नसल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.पर्यटकांची गर्दी आणि मृत्यूची मालिका लक्षात घेता यावर अंकुश लावण्यासाठी एकतर कडक बंदोबस्त लावावा. नाहीतर भविष्यात सदर घटनांची पुनरावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने सदर स्थळावर येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालावी अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.