चंद्रपूर - दाताला-देवाड़ा रोड वर लकी सलूजा यांच्या फॉर्म हाउस वर असलेल्या कोंबडया मृत अवस्थेत आढळून आल्याने येथील कर्मचारी यांनी पाहणी करताच परिसरात अजगर साप असल्याचे लक्षात आले.
Giant Snake in farm house
यावेळी आकाश नामेवार यांनी घटनास्थळ वरुन इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांना माहिती दिली, माहिती मिळताच बंडू धोतरे आपले सहकारी सर्पमित्र जयेश बैनलवार यांना सोबत घेऊन फॉर्महाउस गाठले. सदर अजगर सापाने फॉर्महाउस मधील कोंबडया मारल्या होत्या. तसेच फॉर्महाउस मधे लावण्यात आलेल्या पिवळया रंगाच्या मोठ्या बांबूच्या झाडावर चढला होता. अजगर सापास बांबूवरुन काढून रेस्क्यू करण्यात आले. सदर अजगर साप सहा फुट लांब व जवळपास 8 ते 10 किलो वजनाचा होता. अजगर रेस्क्यू करण्याच्या कामात सर्पमित्र बंडू धोतरे, जयेश बैनलवार यांना आकाश नामेवार सदिप अंबुले, शैलेन्द्र शुक्ला,यादव कलेश्र्वरवार, आणि फॉर्महाउस वरील कर्मचारी यांनी मदत केली.
सदर अजगर सापास पकडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांना देण्यात आली. वनपाल राजेश पाथर्डे व वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत लोहारा-जुनोना जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले.