चंद्रपूर - तब्बल 2 ते 3 आठवडे पावसाने दडी मारल्यावर राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला दिसून येत आहे, पाऊस कधी पडणार याचा इशारा हवामान खात्याने दिला असून 18 ऑगस्टला कोकण ते विदर्भातील काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर सुद्धा संकट कोसळले आहे. Yellow alert chandrapur
