चंद्रपूर - चंद्रपूर मनपा हद्दीतील मोठा प्रभाग म्हणजे बाबूपेठ परिसर, 60 ते 70 हजार नागरिक या प्रभागात मागील 30 वर्षांपासून राहतात, मात्र नगरपरिषद व आता महानगरपालिका असून सुद्धा सदर प्रभाग हा विकासापासून वंचित आहे.
शहरात मनपाने अमृत योजनेचे काम सुरू केले मात्र काम पूर्ण केल्यावर मार्ग तसाच ठेवला, यामुळे शहरातील रस्तेच या खड्ड्यामुळे गायब झाले, आता रस्त्यावर खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. News 34
या विरोधात चंद्रपूर कांग्रेसचे महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी भजन आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधले, अंचलेश्वर मंदिर ते बाबूपेठ रस्ता हा पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे, अनेकदा या मार्गावर नागरिकांचा अपघात झाला आहे, मात्र पालिका प्रशासन या खड्ड्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी यावेळी केला.
आंदोलनात भजन मंडळीने भजन गात खड्ड्यांचा विरोध केला, यावेळी कांग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, चंदा वैरागडे, कुणाल चहारे, इरफान शेख आदींची उपस्थिती होती.