कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जात आहे.याच श्रेणीत वर्ष २०१८ मध्ये गडचांदूरातील ७७ कुटुंबांना घरकुल मंजूर झाले.बांधकामाच्या सुरूवातीला राज्य शासनाकडून टप्प्या,टप्प्याने दोन किस्त मिळाल्या.मात्र उर्वरित तीसरी किस्त केंद्र सरकारकडून आजपर्यंत मिळालेली नाही. या विषयी चर्चा करण्यासाठी 4 ऑगस्ट रोजी घरकुल धारक नगराध्यक्षांना भेटायला नगरपरिषदेत आले होते.नगराध्यक्षांना भेटण्याची वेळ १०/३० ते २ अशी असताना हे सर्व १० वाजेपासून कार्यालयात यांची वाट पाहत होते. दूरध्वनीवरून येण्याची विनंती केली.मात्र सलग चार तास वाट पाहूनही नगराध्यक्षा काही आल्या नाही.नगराध्यक्षांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही असे आरोप यावेळी करण्यात आले आहे.तर प्रकृती खराब असल्याने त्या येवू शकत नाही अशी माहिती नगराध्यक्षांनी यांना दिल्याचे कळते. #news34
केंद्रीय मान्यता व सनियंत्रन समितीद्वारे एकूण ७७ लोकांना घरकूल मंजूर झाले होते.यांतर लाभार्थ्यांनी जानेवारी २०१९ पासून घरांचे बांधकाम सुरू केले.जवळपास फेब्रुवारी २०२० ला पहिली व मार्च २०२१ ला दुसरी किस्त अशी एक लाखाची रक्कम राज्य शासनाकडून मिळाली.मात्र तिसरी किस्त दीड लाख रुपये केंद्र सरकारकडून अद्यापही मिळालेली नाही.पावसाळ्याचे दिवस असल्याने घरात पाणी शिरत आहे. विषारी जीवजंतूचा धोका वाढला आहे. काही लाभार्थी किरायाच्या घरात राहत आहे तर काहींना झोपड्या उभारून राहावे लागत आहे.पक्के घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उसनवारी व कर्ज घेऊन घराचे बांधकाम केले.अशी बिकट परिस्थिती असून "नको रे बाबा नको, शासनाची योजना नकोच,आपली झोपडीच बरी" अशी जळजळीत भावना या घरकुल धारकांनी सदर प्रतिनिधीपूढे व्यक्त केली आहे.
----------///------
"पंतप्रधान आवास योजनेतील रक्कम आजपर्यंत केंद्र शासनाकडून आलेले नाही. या कारणाणे घरकुल धारकांना पैसे देण्यात आले नाही.यासंबंधी क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली आहे. तरीपण येत्या सोमवार,मंगळवार पर्यंत न.प.कडे जमा असलेली थोडीफार रक्कम यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे."
(विक्रम येरणे सत्ताधारी गटनेता)
-----------//---------
"गडचांदूर शहराला निष्क्रीय नगराध्यक्षा लाभल्याने त्यांना आमजनतेशी काहिही देणेघेणे नाही.प्रदुषण,शुद्ध पाणी किंवा दारूचा विषय असो हे जनतेच्या विरोधातच राहीले.मागील चार महिन्यापासून पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी अनुदानासाठी न.प.ला चकरा मारत आहे.त्यांचे साधे समाधान करू शकले नाही.परंतू दारु दुकानाच्या ना-हरकत बाबत अर्ज येताच यांनी लगेच विशेष सभा लावली आणि याला जनतेचा विरोध असतांना सुध्दा ना-हरकत बाबत ठराव मंजुर केला आह.हे जनता विसरणार नाही.अहो तुम्ही नगराध्यक्ष या नात्याने लोकप्रतिनिधी या नात्याने काय प्रयत्न केला हा विषय आहे.तूम्ही कधी आमच्या पत्रावरून शासनाला पत्र काढलं का ? राज्य व केंद्र शासनाला कधी पत्र दिला का ? पाठपुरावा केला का ? एखाद्या सभेत विषय घेतला का ? जेव्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे नियोजन समितीची बैठक असते तेव्हा आपण यासंबंधी उठाव घेतला का ? हा मुख्य विषय आहे.तुम्ही पाठपुरावा करत नाही,पत्रव्यवहार करत नाही आणि केंद्राकडे बोट दाखवता.हे फार चुकीचे असून सर्वसामान्यांची दिशाभूल केली जात आहे.
(अरविंद डोहे विरोधी नगरसेवक)
-------------//---------