वरोरा(प्रति)वरोरा तालुक्यातील वनोजा येथील स्नेहल आत्महत्या प्रकरणात ग्रामीण पत्रकार संघाने पुढाकार घेतला असून मृतक स्नेहलला न्याय मिळेपर्यन्त स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी घेतली आहे. Snehal kite suicide
०२/०८/२०२१रोजी स्नेहल दिलीप किटे वय२१वर्ष हिने आपल्या राहत्या घरी६ ते ६:३०च्या दरम्यान घरच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घरी कोणीच नव्हते, घटनेच्या दिवशी स्नेहलच्या वडिलांनी पोलिस स्टेशन ला जाऊन, आपला जाब ही नोंदविला त्यावेळी पोलिसांनी मर्ग दाखल केला,परंतु तब्बल ६ दिवसांनी आत्महत्येचे बिंग फुटले, स्नेहलच्या मोबाईल वरून आणि प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवरून आत्महत्येचे कारण समोर आले आहे. News34
वनोजा येथीलच स्वप्नील संजय बोधाने आणि त्याचा मित्र हे घटनेच्या एका तासापूर्वी स्नेहलचा चुलत भाऊ वैभव किटे यांच्या किराणा दुकानावर दारूच्या नशेत असतांना आले, त्यांनी दुकानातून थंम्सअप च्या दोन बॉटल घेतल्या आणि अश्लील चाळे करत, आपसात शिवीगाळ करणे सुरू केले, त्याच दरम्यान घरच्या वरच्या मजल्यावर उभ्या असलेल्या स्नेहल कडे पाहून स्वप्नील बोधाने यांने तू खाली ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे,नाही आलीस तर तुझी संपूर्ण गावात बदनामी करीन असे तो बोलत असताना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी स्नेहलला देत होता, आणि आपला मोबाईल सुद्धा त्याने रागाने स्नेहलच्या दिशेने फेकला, हा प्रकार वैभव पाहत होता, असे पोलिस तक्रारीत स्नेहलच्या वडिलांनी म्हटले आहे,
तब्बल ६ दिवसांनी स्नेहलच्या वडीलांनी स्नेहलचा मोबाईल चेक केला असता, सदर प्रकार उघडकीस आला आणि पोलिसात धाव घेतली, परंतु वरोरा पोलिसांची निष्क्रियता लक्षात येताच, दि११ ऑगस्टला थेट जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे साहेब यांची भेट घेत ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, ज्येष्ठ मार्गदर्शक धर्मेश निकोसे व वरोरा तालुक्याचे सचिव सुनिल शिरसाट यांच्या नेतृत्वात तक्रारीचे निवेदन सादर केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी तात्काळ दखल घेत वरोरा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले, स्नेहलचा मोबाईल चेक केल्यास यामध्ये अनेकांची नावे समोर येऊ शकतात, सदर प्रकरणात ग्रामीण पत्रकार संघाने उडी घेतली असून, स्नेहलला न्याय मिळेपर्यन्त स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी घेतली आहे.

