कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या सूचनेनुसर चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी गडचांदूर येथील नुरानी कमिटीचे मो.इर्शाद रज़ा कादरी (राजू कादरी) यांची news34 "शिवसेना कोरपना तालुका समन्वयक" पदी नियुक्ती केली आहे. नवनियुक्त तालुका समन्वयक कादरी हे पक्षाचा प्रसार व प्रचार जोमाने करतील अशी इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
संपर्क प्रमूख प्रशांत कदम यांनी कादरी यांना नियुक्ती पत्र दिले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, कोरपना तालुका प्रमुख तथा गटनेता, नगरसेवक सागर ठाकूरवार,युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रणित अहिरकर,गडचांदूर शहर प्रमुख अक्षय गोरे,यश ठाकूरवार, रजत ठाकूरवार,करण दुबे यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राजू कादरी यांची समाजात वेगळी ओळख असून यांना मानणारा मोठा मित्र परिवार आहे. भविष्यात याचा फायदा शिवसेनेला होणार असे मत व्यक्त होत आहे.

