गुरू गुरनुले
मूल - मुल शहरातील मध्य भागी अनेक वार्डात बिल्डर लाॅबी व व्यावसायिक यांनी मोठ मोठे भुखंड घेऊन नफा कमावण्यासाठी घेऊन ठेवले आहे परंतु कोणतेही कंपाऊड न करता त्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे मुल शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी नगर परिषद प्रशासनानी त्वरीत लक्ष देऊन कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मुल शिवसेना तालुका प्रमुख नितिन येरोजवार यांनी दिला. Mul Shivsena
मुल शहरातील आरोग्याची समस्याबाबत नगरपरिषद प्रशासनाला काही गांभीर्य नाही असे दिसते कारण लाखो रुपये खर्च करून स्वच्छतेचा कंत्राट कंपनीला दिला परंतु नाली सफाई तसेच त्या बाजूला असलेला कचरा साफ केला जात नाही मग बिले कंत्राट दाराच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे तसेच नाली सफाई कधी करतात हेच कोड्याचा विषय आहे . आज कोरोना सदुष्य परीस्थितीत सध्या जिवन जगने सुरू आहे तसेच स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे अशा परीस्थितीत जर या खाली भुखंडापासुन रोगराई ला आमंत्रण देणे सुरू आहे .
त्या खाली भुखंडात गावठी डुकराचा हौदोस आहे तसेच आजूबाजूचे नागरीक कचरा टाकतात या कचर्याची विल्हेवाट योग्यवेळी होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरते त्यामुळे आजार व साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्या तसेच अजुन पर्यत नालीमध्ये मच्छराची औषधी फवारणी तसेच घरोघरी फोगिंग मशीन ने फवारणी केलेली नाही या अनुषंगानेच त्या बिल्डरला नोटिस बजावून कार्यवाही करावी कारण खुल्या भुखंडात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे ,सांडपाणी जमा होतो त्यामुळे मच्छराची उत्पती होते आणि मलेरिया व डेंगु चे प्रमाण जास्त पाहण्यास मिळत आहे .मुल शहरातील अनेक वार्डामध्ये अस्वच्छता आहे .नाल्या,रस्ते नाही सध्या पावसाचे दिवस आहे अशा वेळी रस्तावर खोल गड्डे पडले असुन सर्वत्र पाणी साचत आहे या गोष्टी कडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले तरी लवकरात लवकर नोटीस पाठवून भुखंड स्वच्छ करून नागरिकाच्या आरोग्याचे जतन करावे अशी मागणी नगर परिषद मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांना निवेदन देत मुल तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केली या शिष्टमंडळात शिवसेना शहर प्रमुख राहुल महाजनवार,तालुका समन्वयक अनिल सोनुले, युवा सेना तालुकाप्रमुख संदिप सुरेश निकुरे,उप तालुकाप्रमुख रवी शेरकी, शहर समन्वयक अरविंद करपे,विनोद काळबांधे, प्रविण मोहुर्ले हजर होते.
