प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - वृक्ष लावा एक, फायदे होतील अनेक नैसर्गिक आक्सिजन केवळ वृक्षच देऊ शकते या उदात्त हेतूने वृक्षा रोपणाच्या व संवर्धनाच्या कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या मुल येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा सचिव सौ.रत्नाताई गुरुदास चौधरी यांनी नुकतीच नागपूर विभाग सचिव पदी निवड करण्यात आली आहे. #news34
तसेच वृक्ष लागवडीसाठी स्वतःच्या घरी विविध वृक्षाची बियाणे गोळा करून पिशव्यांमध्ये माती भरून अनेक जातीचे शेकडो वृक्ष तयार करण्यासाठी मेहनत घेणारी आणि वृक्ष संवर्धनाच्या कार्य हे माझे नियमित दैनंदिन कार्य आहे असे समजून संस्थेच्या सर्व सहकारी यांना सहकार्य करणाऱ्या मुल तालुक्यात संघटिका सौ.सुषमा कुंटावार यांचीही नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल नागपूर विभागाच्या उपाध्यक्षा तेजस्विनी नागोशे, जिल्हा अध्यक्षा ललिता मुस्कावार, तालुका संघटिका माधुरी गुरनुले, अल्का राजमलवार, वंदना गुरनुले, इंदूताई वाढई, नंदा शेंडे, कविता मोहूर्ले, शशिकला गावतुरे, प्रा.रत्नमाला भोयर, प्रभाताई चौथाले, मीराताई शेंडे, मंगला गोंगले, सुनीता खोब्रागडे, सावली तालुका संघटिका प्रीती झोडे, संस्थेचे सहकारी गुरु गुरनुले, गुरुदास चौधरी, श्रीरंग नागोशे, रणजित नरेड्डीवार, यांचेसह संस्थेच्या सर्व पदाधिकारी व संघटिका यांनी दोन्ही पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.