कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
समाजात घडत असलेल्या चांगल्या वाईट घडामोडींना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एक पत्रकार आपल्या लेखनातून करतात.आपले कर्तव्य बजावत असताना काही जण नाराज तर काहीकडून प्रशंसा होते.मात्र एखादा कायदेचा रक्षणकर्ता जबाबदार अधिकारी जर बातमी प्रकाशित केली म्हणून सुडबुदद्धीने, आपल्या पदाचा गैरवापर करून त्या पत्रकारावर चक्क गंभीर गुन्हे नोंदवायला पोलीसांवर दबाव टाकतो हे निषेधार्थ आहे. असाच प्रकार एका वृत्तपत्र व पोर्टलचे तालुका प्रतिनिधी तथा कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सैय्यद मूम्ताज़ अली यांच्याबाबतीत समोर आला आहे.यांनी संबंधित तक्रारदाराच्या लेखी तक्रारी वरून रेती चोरीची बातमी प्रकाशित केली म्हणून कोरपनाचे तहसीलदार वाकलेकर यांनी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे पत्रकार अली यांच्या विरोधात तक्रार दाखल करून गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांवर दबावतंत्राचा वापर केला.मात्र कायद्याचे रक्षणकर्ते पोलीसांनी सदर प्रकरणी योग्य ती कारवाई केली आहे.तहसीलदार वाकलेकर यांचे हे कृत्य त्यांच्या पदाला न शोभणारे असून तहसीलदार हे स्वतः कायद्याचे पालन करणारे तालुका दंडाधिकारी म्हणून एक जबाबदार पदावर विराजमान अधिकारी आहेत.हे जर पत्रकार अली यांच्यावरील आपला वचपा काढण्यासाठी अशाप्रकारे गुन्ह्याचे सत्र राबवित असेल तर साधारण जनतेंनी न्यायाची मागणी कोणाकडे करायची हा प्रश्न पडतो.रेती तस्करी अनाधिकृत्त पकडलेले ट्रॅक्टर,तालुक्यात अनेक ठिकाणी होत असलेले अवैध उत्खनन याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न जर एक कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून केला तर याचा वचपा काढण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का ? हे तुम्हीच ठरवा.
वास्तविक पाहता कोरपनाचे तहसीलदार वाकलेकर यांच्या कार्यकाळात अनेक प्रकरणाचा निपटारा झालेला नाही. यांनी आजपर्यंत कोणतेही स्वस्त धान्य दुकान तपासले नाही.एकाही तलाठ्याचे दप्तर तपासले नाही अशी माहिती असून तालुक्यात मोठमोठे ठेकेदार सर्रासपणे दगड,चुनखडीचे उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवत असताना तहसीलदार मात्र बघ्याची भूमिका वठवत असताना दिसत आहे.पकडीगूड्डम धरण क्षेत्र,आकोला, पारडी,नारंडा,तळोधी याठिकाणी कोट्यवधींची चुनखडी उत्खनन झाली मात्र याकडे लक्ष न देता रेती साठवणूक व वाहतुक संबंधी बातमी प्रकाशित केली म्हणून सदर पत्रकारावर गुन्हा नोंदवायचा कसा याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले जात आहे.
एक तालुका दंडाधिकारी(मॅजिस्ट्रेट) पोलीसांवर दबाव टाकून सदर गुन्हा कायद्यात बसत नसतानाही गुन्हा नोंदविण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला आहे.यांच्या कार्यकाळात अनेक केसेस पेंडींग पडून असल्याचे कळते,वर्ग १ व २ चे प्रकरण निकाली लागले नाही,बरेच खाते थप्पी पडलेले आहे,अनेक सुनावण्या घेतल्या जात नाही असे आरोप नागरिकांकडून होत आहे.आजपर्यंत यांनी कीती तलाठी कार्यालय तपासल्या,किती स्वस्त धान्य दुकाने तपासली याचा तपास वरिष्ठांनी करावा,शासनाचे निर्धारित दरांपेक्षा अधीक दराने स्वस्त धान्याची विक्री होत असल्याची ओरड तालुक्यातील कित्येक गावात होत असताना आजपर्यंत काही अपवाद वगळता तहसीलदारांनी दुकाने तपासून कारवाई केल्याचे दिसून येत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांनी घडत असलेल्या घटनांसंबंधी सत्यता जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न केला तर सुडबूद्धीने त्याला विवीध माध्यमातून अडकविण्याचे धोरण अवलंबण्याचा प्रकार सपशेल चुकीचा. अशी चर्चा सुज्ञ नागरिकांत ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.अशा तहसीलदाराच्या संपूर्ण कारभाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी,दोषी आढळल्यास सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा येणाऱ्या काळात कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने धरणे आंदोलन,आमरण उपोषण असे संवैधानिक मार्ग अवलंबावा लागेल.या अधिकाऱ्यांचे पाप उघड करणाऱ्या पत्रकारावर जर हे गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया राबवत असेल तर या कृत्याचा निषेध होने गरजेचे.
