बल्लारपूर - वृक्षारोपण करून आज 19 ऑगस्ट रोजी विश्व छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला, बल्लारपुरातील स्टुडिओ कलाकेंद तर्फे आज वृक्षारोपण करून विश्व छायाचित्र दिवस साजरा करून "पेड लागाओ पेड बचाओ" चा संदेश देत वृक्षारोपनाचे महत्व सांगण्यात आले, गोरक्षण वॉर्ड येथे विकास राजूरकर यांच्या घरातील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने बल्लारपुर येथील पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील व समाज सेवी श्री श्रीनिवास सुंचुवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, या वेळी स्टुडिओ कलाकेंद्र चे संचालक विनोद राजूरकर, विकास राजूरकर, सौ वर्षा सुंचुवार, अरुणा राजूरकर, कुलदीप, श्री भाटिया जी आदी उपस्थित होते.