चंद्रपूर : देश पारतंत्र्यात असताना जशी परिस्थिती होती तशीच परिस्थीती सध्या देशात आहे. त्यामुळे सेवादलाची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे परंतु काही शक्ती देशाला तोडण्याचे काम करत आहेत. या जातीयवादी, देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सुभाषचंद्र बोस, राजीव गांधी हे सुद्धा सेवादलाचे अध्यक्ष होते. सेवादल हा काँग्रेसचा कणा आहे. देशातील सध्याची परिस्थीती पाहता सेवादलावर मोठी जबाबदारी असून देश तोडण्याऱ्या शक्तींना रोखा व केंद्रातील सरकारचे अपयश तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. #news34
आज गांधी चौक येथे जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिन निमित्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या प्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते झेंडा वंदन देखील करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. Chandrapur congress sevadal
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस सेवादल जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत खनके, मनपा काँग्रेस गटनेते सुरेश महाकुलकर, काँग्रेस सेवादल शहर अध्यक्ष शिरीष तपासे, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, नगरसेवक नंदू नगरकर, स्वाती त्रिवेदी, नगरसेविका सुनीता लोढीय, महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कार, अश्विनी खोब्रागडे, चित्राताई डांगे, अनुताई दहेगावकर, विनोद संकत, उमाकांत धांडे, संगीत अमृतकर, शालिनी भगत, केशव शेंडे, दिवाकर करणेवार, नारायण ठेंगणे, रुपेश ताजने, लता बारापात्रे, सागर वानखेडे, अनिल शिंदे, राजेंद्र गर्गेलवार, किशोर जेणेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतानाखासदार बाळू धानोरकर म्हणाले की, देशाची सेवा करण्याचे व्रत घेऊन नारायण हर्डीकर यांनी नागपुरात सेवादलाची स्थापना केली. काँग्रेसचा विचार हा देशहिताचा विचार असून तो शेवटच्या माणसापर्यंत पोहवण्याचे काम सेवादलाने केले आहे. सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे. इंग्रजांच्या विरोधात सेवादलाने संघर्ष केला. आता देशातील सत्तेविरोधातच संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या देशाच्या विकासाची पायाभरणी केली. मोठ-मोठे प्रकल्प उभे केले, संस्था निर्माण केल्या. नेहरुंनी उभे केलेले सर्व वैभव एक एक करुन विकण्याचे काम सध्या केले जात आहे. इतिहास पुसण्याचे कामही केले जात आहे. या शक्तींना थोपवण्यासाठी सेवादलाने नव्या ताकदीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रात सेवादलाचे काम अशा पद्धतीने करा की त्याची दखल देशपातळीवर घेतली पाहिजे.