घुग्घुस :- रविवार 8 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता म्हातारदेवी येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली त्यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तक्रारी दिल्या.
फिर्यादी व आरोपी यांच्यात कचरा घरासमोर का फेकला म्हणून आधी शाब्दिक बाचाबाची व नंतर हाणामारी झाली. #news34
फिर्यादी तानेबाई मारोती धुर्वे (70) रा. म्हातारदेवी यांच्या तक्रारी वरून आरोपी ज्योती नरेंद्र वैरागडे (41), नरेंद्र वैरागडे (51), नंदिनी वैरागडे (19) व एक अल्पवयीन सर्व रा. म्हातारदेवी यांच्या विरुद्ध कलम 324,323,504 (34) गुन्हा दाखल करण्यात आला तर फिर्यादी ज्योती नरेंद्र वैरागडे (41) रा. म्हातारदेवी यांच्या तक्रारी वरून आरोपी तानेबाई मारोती धुर्वे (70), शारदा धुर्वे (40), प्रकाश धुर्वे (26), विशाल धुर्वे (25) सर्व रा. म्हातारदेवी यांच्या विरुद्ध कलम 324,323,504 (34) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोहवा.सिद्धार्थ रंगारी, अशोक आसुटकर करीत आहे.