चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे डोहाळे लागताच आता नवनवीन हौशी भावी नगरसेवक पुढे येत आहे, मात्र चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार हे महानगरपालिकेच्या घोटाळ्याविरोधात 9 ऑगस्टला रणशिंग फुंकत आहे.
कोरोना काळातील पालिकेचा कारभार, 200 कोटी लेखा परीक्षणात घोटाळा, कोरोना काळात सुद्धा नवी कार, वाहनाला VIP क्रमांक, अमृत योजना अश्याया विविध विषयांवर 9 ऑगस्टला आमदार जोरगेवार आंदोलन करणार आहे.
आमदारांच्या या आंदोलनाला भाजप उत्तर देण्यासाठी पुढे आली आहे, नागरिकांना 200 युनिटच्या भूलथापा यावर आमदार जोरगेवार यांच्या विरोधात भाजपचे घंटानाद आंदोलन होणार आहे. #news34
पालिका सत्तेतील भाजप व आमदार जोरगेवार हे एकमेकांविरोधात आंदोलन करणार आहे मात्र भाजप व आमदार जोरगेवार यांनी सध्या शहरात सुरू असलेल्या डेंगूची सुरू असलेली साथ, शहरातील रस्ते पूर्णतः खड्ड्यात गेलेले आहे.
या नागरिकांच्या समस्येवर पालिका व आमदार यांनी बोलायला हवं.
हे सोडून यांनी काय केलं? त्यांनी काय केलं? यावर एकमेकांच्या उणिवा शोधून काय फायदा..
खरे जनप्रतिनिधी असाल तर नागरिकांच्या हित कुठे आहे यावर लक्ष दिलं असत तर आज भाजप व आमदार जोरगेवार यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती.
सध्या सुरू असलेलं कोरोनाच संकट व राज्य सरकारचे आंदोलन, धरणे बाबत लागू असलेल्या नियमांना उद्या भाजप व आमदार हे दोघेही तडा देणार आहे, नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीचं असतात.