चंद्रपूर - मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑनलाइन सट्टा बाजाराचा News34 ने वृत्त प्रकाशित केल्यावर दुसऱ्याच दिवशी सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे.
बेकायदेशीर मार्गाने चंद्रपुरात सुरू असलेल्या ह्या रॅकेटचं सत्य जेव्हा बाहेर आले त्यावेळी या अवैध व्यवसायिकांचे धाबेचं दणाणले, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या या रॅकेट साम्राज्य सर्वदूर पसरले आहे, या अवैध धंद्याचे मास्टर माईंड चंद्रपूर शहरातीलचं आहे, मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत, शासनाचा महसूल बुडवीत हे साम्राज्य सर्रासपणे सुरू होते.
News34 ने जेव्हा या रॅकेटचा पर्दाफाश केला त्यावेळी मात्र हे दुकाने बंद करण्यात आली.
शहरातील मुख्य भागात पडद्याआड या Online Lottery चा गोरखधंदा किती दिवस बंद राहणार याकडे News34 चे लक्ष असणार आहे.
