कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
स्वातंत्र्यपूर्व काळातील मौजा कुसुंबी हे गाव १९४७ ते १९९९ पर्यंतच्या सर्व गाव नकाशात गावठाणाची ७/१२ स्वतंत्र नोंदी आहे.पुर्वीपासून याठिकाणी आदिवासी कोलाम समाजाचे ४२ घरे होती.पूर्वी हे गाव शेणगाव ग्रा.पं.हद्दीत होते.नंतर विभाजन होऊन याचा समावेश आसापूर ग्रा.पं.मध्ये करण्यात आला.१९८१ ते ८४ दरम्यान माणिकगड सिमेंट कंपनीने चुनखडी उत्खननासाठी २८ आदिवासी शेतकऱ्यांची जमीन पुष्ट अधिकार प्राप्त करून चुनखडी काढण्यात आली. शासनाकडून २० वर्षाच्या लीज करार आधारे चुनखडी,दगड काढण्यात आले. याठिकाणी गावठाण व स्मशानभूमी अस्तित्वात असताना कंपनीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला.येथील समशान भूमी उद्ध्वस्त केली मात्र कुसुंबी येथील आदिवासी कोलाम समाजाच्या ४२ कुटुंबांनी घरे बांधुन कुटुंबांसह खदान क्र.१ मध्ये गावठाणात घरे बांधुन सहकुटुंब राहायला सुरुवात केली.
याठिकाणी ग्रा.पं.ने सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करून कागदपत्रे व पुरावे आधारे ही मालकी आदिवासी कोलामांची असल्याने,महसुली रेकॉर्ड मध्ये गावठाणची नोंद असल्याने सर्व कुटुंबांची नमुना ८ व 9 मध्ये नोंदी घेऊन घर टॅक्स व पाणीपट्टी कर वसूल करून मालमत्तेच्या नोंदी ग्रा.पं. रेकॉर्डवर घेतल्यामुळे या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना तसेच आदिवासी कोलाम शबरी आवास योजनेंतर्गत घरे मंजूर करावी अशी मागणी आदिवासी विकास विभागाकडे करण्यात आली आहे.
तसेच याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा दूर असल्याने कूपनलिका व विद्युतीकरण करण्याची मागणी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरेकडे राकाँ जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी केली असून ग्रा.पं.ने कुसुंबी येथील कोलाम आदिवासी यांच्या मूलभूत आवश्यक गरजांचा आराखडा तयार करावा तसेच यांना पक्की घरे, वीज, पाण्याची सुविधा करावी हे भाग आदिवासी उपयोजनेत समाविष्ट असून पेसा अंतर्गत येत असल्याने तेथील दारिद्रय रेषेखालील व गरीब कुटुंबांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी पंचायत समितीने येथील मागणीचा विचार करावा असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. अखेर आदिवासी कोलाम समाजाला कर आकारणी झाल्याने गावठाणाच्या विकासासाठी चालना मिळेल असे आशेचे किरण दिसू लागले आहे.