घुघुस - 1 जानेवारी 2021 ला मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित ग्रामपंचायतचे नगर परिषदेत रूपांतर झाले, मात्र 8 महिन्यापासून नगरपरिषद प्रशासक पूर्णवेळ उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. News 34
मात्र आता घुघुस नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाला असून नगरपरिषदेत प्रथम महिला मुख्याधिकारी मिळाली आहे, आर्शिया जुही यांनी आज पदभार सुद्धा सांभाळला.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी नगरपरिषदेत वर्ष 2016 ते 2018, राजुरा नगरपरिषदेत वर्ष 2018 ते 2021 या कालावधीत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या, आता त्यांची बदली घुघुस नगरपरिषदेत झाली आहे.
13 ऑगस्टपासून आर्शिया जुही यांनी मुख्याधिकारी म्हणून घुघुस नगरपरिषदेचा पदभार सांभाळला आहे.

