कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रे दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह्य वक्तव्य केले.याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.तमाम शिवसैनिक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात राणे यांच्या वक्तव्याचा निषेध,निदर्शने करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना तालुका प्रमुख तथा न.प.गटनेता,नगरसेवक सागर ठाकूरवार यांच्या नेतृत्वात निदर्शन,निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी सागर ठाकूरवार यांच्यासह narayan rane नगरसेवक तथा तालुका उपप्रमुख शेख सरवर, नगरसेविका सौ.वैशाली गोरे, नगरसेविका सौ.किरणताई अहिरकर, नगरसेविका सौ.सुनीता कोडापे,तालुका समन्वयक इर्शाद कादरी, शहरप्रमुख अक्षय गोरे,युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रणीत अहिरकर,युवासेना शहर समन्वयक यश ठाकूरवार,रजत ठाकुरवार,सागर टोंगे, करण दुबे,रोहीत दुराटकर,राजेश भोयर, अमरदीप हिरादेवे,संजय हिवरे,कैलाश कुइटे,दर्शन कोडापेसह इतर शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.