चंद्रपूर, ता. ९ : इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन. हुतात्मांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्यात जगत आहोत, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा स्मारक वाचनालय, सिव्हील लाईन, चंद्रपूर येथे हुतात्म्यांना पुष्पचक्र, मालार्पण व आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्पचक्र, मालार्पण करण्यात आले. #news34
यावेळी झालेल्या झेंडावंदनाला अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, झोन सभापती छबूताई वैरागडे, उपायुक्त अशोक गराटे, मुख्य लेखा अधिकारी मनोज गोस्वामी, सहायक आयुक्त शीतल वाकडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) ङाॅ. अमोल शेळके, नगर सचिव कवङू नेवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.