चंद्रपूर - महानगरपालिका निवडणूक जवळ आली असताना सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलेच आंदोलन युद्ध सुरू झाले आहे.
आमदार जोरगेवार विरुद्ध चंद्रपूर महानगरपालिका असे आंदोलन 9 ऑगस्टला चंद्रपुरातील गांधी चौकात करण्यात आले.
मात्र दोन्ही आंदोलन पोलिसांनी हुसकावून लावले.
विरोधकांच्या आरोपांच खंडन करण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांनी 9 ऑगस्टला पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
महापौर यांच्या वाहनाला 70 हजारांचा VIP क्रमांक, कोरोना काळातील डब्बा घोटाळा, अमृत योजना, कचरा संकलन घोटाळा अश्या अनेक आरोपांचे खंडन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.
यावेळी महापौर यांनी आमदार जोरगेवार यांच्यावर ताशेरे ओढत नागरिकांना 200 युनिटचे स्वप्न दाखवीत धोका दिला, मागील 2 वर्षात त्यांनी जनतेच्या हिताचे काही काम केले नाही, स्वतः नागरिकांचे कामे करायचे नाही व उठसूट आंदोलन करायचे, हा कसला प्रकार आहे, कोविड काळात आमदार निधीतून रुग्णालय उभारले मात्र ते रुग्णालय डॉक्टर विना सुरू होते.
महापौर यांनी आमदार जोरगेवार यांच्या 200 युनिटच्या मागणीला पाठिंबा देत आम्ही पालिकेत तसा ठराव पारित करण्याचा प्रयत्न नक्कीचं करू.
आमदार जोरगेवार यांनी जे आरोप केले त्याचे पुरावे द्यावे, असे बिनबुडाचे आरोप करून काय फायदा. #news34
चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदी जेव्हा
मी विराजमान झाली, त्या दिवसापासून महापालिका क्षेत्रात विकासाची गंगा वाहत आहे, आमदार मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर मनपात प्रचंड प्रमाणात विकास होत आहे.
पत्रकार परिषदेत उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी व नगरसेवक संदीप आवारी उपस्थित होते.