प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम केले आहे.एवढेच नव्हे तर साप चावून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना, घर जळून बेघर झालेल्यांना व धानाचे पुंजने जळून आकस्मिक आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन रुग्णांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम बँक करीत असून मुल तालुक्यातील दुगाला (माल) येथील अल्प भूधारक शेतकरी महिला इंदिराबाई माधव सातपुते यांना कँसर झाल्याने उपचारासाठी ४००००/-हजार रुपये मदत जाहीर केली असून मदतीचा चेक देण्यासाठी दुगाला (माल) येथे रुग्ण महिलेच्या घरी जाऊन बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते अनेक गावकऱ्यांच्या उपस्थितीत चेक देण्यात आला.
यावेळी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावार, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, सरपंच गोविंदराव वनकर, गणेश सातपुते, जगन पा. सातपुते, भुपेश दुर्गे, राजकुमार खोब्रागडे, वासुदेव सातपुते, घनश्याम सातपुते, दयाजी सातपुते, नंदकिशोर घोंगडे, परशुराम सातपुते, दशरथ सातपुते यांचेसह अनेक गावकरी उपस्थित होते.