सावली - कोरोनानंतर आता डेल्टा प्लस च सावट जिल्ह्यात ओढावित आहे, भद्रावती येथील महिला डेल्टा प्लस संक्रमित झाल्यावर आता सावली तालुक्यातील निफन्द्रा गावातील 32 वर्षीय युवक डेल्टा प्लस संक्रमित आढळला आहे.
सदर युवक हा गोव्याला फिरायला गेला होता, 2 ऑगस्टला नागपूर येथे त्या युवकाचे swab घेण्यात आला होता. Delta Plus Variant
25 ऑगस्टला त्या युवकाच्या अहवालात डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.
विशेष म्हणजे हा युवक जुलै महिन्यात कोरोना बाधित होता.
सध्या निफन्द्रा गावातील 20 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, तहसीलदार यांनी नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले असून सहकार्य करण्याची विनंती नागरिकांना केली आहे.
