कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीर महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांना याचे चटके सहन करावे लागत आहे.यात दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ लक्षात घेता डिझेल चोरी व काळाबाजारीचे प्रकरणांत सुद्धा वाढ झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर गडचांदूर भोयगाव मार्गावरील नारंडा फाटा येथील "सॅम्युअल होमियोपैथी" या दवाखान्या समोरील तसेच भोयगाव मार्गावर विराजमान टायर पंक्चरच्या दुकानातील काही दुकानात अवैधरीत्या डिझेल साठवणूक करून विक्री केली जात आहे.यातील एका दुकानदाराला वाहन चालक कशाप्रकारे स्वतःच्या वाहनातून डिझेल काढून देत आहे आणि दुकानात साठवलेले डिझेलचे प्रकरण तीन महिन्यापूर्वी News 34 ने उजेडात आणले होते. मात्र ब्रेक नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच बनल्याचे चित्र आहे.
सदर क्षेत्र हे गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असून त्यावेळी यातील एका पंक्चर दुकानदारावर कारवाई सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे.तरीपण या अवैध धंद्यावर अंकुश लागलेला दिसत नसून पुन्हा जोरात सुरु आहे.यातील काही दूकानात दारू सुद्धा विकली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. यासर्व प्रकारामुळे सदर क्षेत्राच्या "बीट इंचार्ज" ची भूमिका संशयास्पद ठरत असून यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.सदर मार्गावरील सिमेंट,कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या वाहनांचे चालक स्वत: डिझेल काढून यातील काही टायर पंक्चर दुकानदारांना अतिशय अल्प दरात विकतात आणि ही मंडळी याची साठवणूक करून एका मालवाहू टेम्पोद्वारे जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागात तसेच कोरपना तालुक्यातील पारडी, परसोडा सह इतर दुर्गम ठिकाणी #news34 असलेल्या वाहनांना व JCB मशिनला योग्य दरात नेऊन देतात.अशी माहिती आहे. यातील गंभीर बाब म्हणजे सदर टेम्पो चालकाला एक हात नाही आणि तो स्वतःच यासर्व ठिकाणी डिझेल पोहचवतो.काही दिवसांपूर्वी सदर प्रतिनिधींनी याला गडचांदूरातील बसस्थानक जवळ टेम्पो चालवताना पाहिल्यावर यासंबंधी विचारले असता अपघातात एक हात गेल्याचे त्यांनी सांगितले.
असे असताना रस्त्यावर ठिकठिकाणी उभ्या पोलीसांच्या ही बाब निदर्शनास आली नसेल का ? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.टायर पंक्चर दुकानाच्या नावाखाली इंधन विक्रीचे सर्व नियम धाब्यावर बसवून येथील काही दुकानात सर्रासपणे अवैधरीत्या डिझेलची साठवणूक व विक्री तसेच अवैध दारूविक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे.बीट इंचार्ज कडून थातूरमातूर कारवाई करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार याठिकाणी सुरू असून आता पोलीस अधीक्षकांनीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गडचांदूर,भोयगाव मार्गावरील टायर पंक्चरच्या नावाखाली काही ठिकाणी सुरू असलेले हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात आली असून कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गडचांदूर,भोयगाव मार्गावरील टायर पंक्चरच्या नावाखाली काही ठिकाणी सुरू असलेले हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात आली असून कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.