News34 chandrapur
घुग्घुस - अमराई वार्ड नं 1 येथील आज दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे चंद्रपूर जिल्हा महासचिव मा. सुरेशभाऊ म.पाईकराव यांनी अमराई वार्ड क्र 1 मध्ये भेट देऊन असे सांगण्यात आले की दि.17ऑगस्ट 2021 रोजी मृत्यूक सुरज माने व रत्नमाला माने यांना दोन मुल आरूष वय तीन वर्ष व आर्यन वय नऊ महिने असे दोन मुले आहे दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी पीडित परिवारास भेट देण्या करीता आमदार, व अन्य पक्षाच्या नेत्यांनी गर्दी करून भेट देत पीडित परिवारास पाच हजार, दहा हजार रु, चा चेक देऊन परिवारासोबत फोटो काढून समोरील निवडणुकी करीता पेपर बाजी व न्यूज बाजी केली व काही पक्षांनी तर पीडित परिवाराच्या मदती करीता घुग्घुस व अमराई वार्ड क्र 1 मध्ये पैसे गोळा करीत आहे. BRSP GHUGHUS
असे घुग्घुसच्या नागरिकांना सांगतात की घुग्घुस मध्ये जे पण सफाई चे काम आहे हे आम्ही आमच्या पैशाने करीत असतो मग आज त्या पीडित परिवारास मदत करण्याची वेळ आली असता कशाला त्यांच्या नावाने पैसे गोळा करीत आहे हा पक्ष पीडित परिवाराच्या नावावर पैसे गोळा करून समोरील निवडनुकीची तयारी करीत आहे असे चित्र दिसून येत आहे. अशा कोणताही पक्षाच्या व्यक्तिला जो पीडित परिवाराच्या नावाने पैसे मागत असेल तर कृपया कुणी पैसे देऊ नये जर का पीडित परिवारास मदत करण्याची इच्छा असेल तर घुग्घुस येथील नागरिकांनी स्वत: त्या परीवाराच्या घरी जाऊन मदत करा असे आवाहन महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी केले.
आज इतक्या पक्षाच्या नेत्यांनी पीडित परिवारास भेट दिली असुन कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी त्या पीडित परिवाराची जबाबदारी घेतली नाही ही बाब विचारात घेऊन ( बी.आर.एस.पी) चे चंद्रपूर जिल्हा महासचिव मा.सुरेशभाऊ म.पाईकराव यांनी पीडित परीवाराच्या मुलांचे समोरील भविष्य उज्वल करण्या करीता पूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही B.R.S.P घेईल असे आश्वासन देण्यात दिले. शरद म. पाईकराव, विधानसभा सचिव रमाबाई सातारडे, घुग्घुस शहर महिला आघाडी अध्यक्ष मायाताई सांड्रावार, घुग्घुस शहर महासचिव अशोक आसमपल्लिवार, घुग्घुस सचिव जगदीश मारबते, घुग्घुस महिला आघाडी उपाध्यक्ष विभाताई सोनटक्के, घुग्घुस महिला आघाडी सचिव जोशनाताई डांगे, घुग्घुस युवा आघाडी अध्यक्ष ईश्वर बेले, युवा आघाडी उपाध्यक्ष दीपक दीप, युवा आघाडी महासचिव रोशन नळे, युवा आघाडी सचिव फारूक शेख, नकोडा शहर अध्यक्ष नितीन कनाके, नकोडा शहर महासचिव शिवदास सदाफडे, अमराई वार्ड नं 1 अध्यक्ष इरफान पठाण, अमराई वार्ड नं 1उपाध्यक्ष करण कांळबांधे, वार्ड नं. 2 अध्यक्ष राकेश पारशिवे, वार्ड नं. 3 अध्यक्ष सदानंद डोरके, वार्ड नं. 6 अध्यक्ष अशोक भगत, वार्ड नं 6 अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन माहूरे, दत्ता वाघमारे, भाग्यश्री भगत, मिनाताई गुडदे, आदित्य सिंग, हरीदास मोहजे दिलीप बंडलवार, विठ्ठल रासपलल्ले कार्यकर्ते उपस्थित होते.